पुणे

एमसीए अभ्यासक्रमासाठी चौदा जुलैपर्यंत अर्जाची मुदत

CD

पुणे, ता. ६ : राज्यातील सरकारी, अनुदानित, विद्यापीठाचे व्यवस्थापन विभाग, विद्यापीठ व्यवस्थापित संस्था, विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांमध्ये मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (एमसीए) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १४ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. अभ्यासक्रमाची अंतिम गुणवत्ता यादी २२ जुलै रोजी जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांनी या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी करायची आहे. नोंदणी करून आवश्यक ती कागदपत्रे भरून अर्ज पूर्ण करायचा आहे. अर्जाच्या पडताळणीसाठी ई-स्क्रुटीनी किंवा प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन पडताळणी असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
..........
प्रवेश प्रक्रियेचा तपशील
कार्यवाही : कालावधी
- ऑनलाइन अर्ज नोंदणी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे : १४ जुलैपर्यंत (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)
- कागदपत्रांची पडताळणी करणे, अर्ज निश्चिती करणे : ७ ते १५ जुलैपर्यंत
- तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे : १७ जुलै
- तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर हरकती, आक्षेप नोंदविणे : १८ ते २० जुलै
- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : २२ जुलै
....
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.mahacet.org
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT