पुणे

अन्न पुरवठा कार्यालयांत पन्नास टक्के पदे रिक्त

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ : पुणे जिल्हा आणि शहर अन्नधान्य वितरण कार्यालय अशा दोन्ही कार्यालयांसाठी २०९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी पन्नास टक्क्यांहून जास्त म्हणजे तब्बल ११० पदे रिक्त आहेत. अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रिक्तपदांबाबतची विधिमंडळात माहिती दिली.
पुणे जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना मिळून एकूण नऊ लाख ६१ हजार २८२ शिधापत्रिकाधारक आहेत. खात्याच्या आकृतीबंधाबाबत शासन शुद्धीपत्रक १५ डिसेंबर २०२२ नुसार जिल्हा पुरवठा कार्यालयात १३३, तर शहर अन्नधान्य वितरण कार्यालयात ७६ अशी एकूण २०९ पदे मिळून पुणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत जिल्हा पुरवठा कार्यालयात ५९, तर शहर अन्नधान्य वितरण कार्यालयात ४० असे ९९ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. पुरवठा विभागाची ५० टक्के पदे रिक्त असल्याचे आणि मंजूर पदांपेक्षा प्रत्यक्षात कमी पदे भरल्याची बाब खरी आहे, असेही आमदारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर माहिती देताना भुजबळ यांनी सांगितले.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

Pune Civic Negligence: मुंढव्यात निकृष्ट सांडपाणी कामामुळे रस्त्यात खोल खड्डा; ट्रक अडकला, महापालिकेवर नागरिकांची झोड

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT