पुणे

पालखी मार्गच्या कामास अनेक अडथळ्यांमुळेच विलंब

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ : मंजूर कामात झालेली वाढ आणि प्रलंबित भूसंपादन अशा विविध अडचणींमुळे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाला विलंब होत असल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधिमंडळात दिली.
पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणाबाबत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चव्हाण त्यांनी ही कबुली दिली. ते म्हणाले, ‘‘पालखी महामार्ग केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारीत आहे. या रस्त्याच्या ज्या भागामध्ये काम सुरू नाही, त्या भागात काही ठिकाणी पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्यात आला आहे. रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी नियमितपणे करण्यात येते. महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत मे महिन्यापर्यंत होती, मात्र मूळ कामात झालेली वाढ, काही ठिकाणी प्रलंबित असलेले भूसंपादन, अतिरिक्त उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्यांचे स्थलांतर अशा अनेक अडचणींमुळे विलंब झाला. आता या प्रकल्पाचे काम येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.’’
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT