पुणे

मतदारयाद्या दुसऱ्यांदा अद्ययावत होणार

CD

पुणे, ता. ६ : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने मतदारयादी अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर केला असून, चालू वर्षात दुसऱ्यांदा याद्या अद्ययावत होणार आहेत. मात्र जनगणना झाली नसल्याने जिल्हा प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील अंदाजित ८९ लाख मतदार संख्या गृहीत धरून काम सुरू केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून मतदारयादी अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. मतदार यादीत नव्याने नाव
नोंदविणे, नाव अथवा पत्त्यामध्ये बदल, दुबार आणि मृत नाव वगळणे आदी कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी २५ जुलैला, तर अंतिम मतदार यादी २० ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे.
यासंदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर म्हणाल्या, ‘‘सन २०११ नंतर देशभरात जनगणना झालेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील १८ वर्षांपुढील मतदारसंख्या ८९ लाख ७६ हजार ६९० झाली आहे. ही मतदारसंख्या अंदाजित आहे. जिल्ह्यात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी केली जाणार आहे. मात्र मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाइन भरून घेऊन संबंधित विद्यार्थ्यांच्या जिल्हा प्रशासनाकडे पाठविले जाणार आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक मतदारांपैकी मृत मतदारांची नावे वगळली जातील. परिणामी विधानसभेसाठी तयार होणाऱ्या अंतिम मतदारयादीत जिल्ह्याची मतदारसंख्या कमी-जास्त होऊ शकते. सद्य:स्थितीत म्हणजेच २५ एप्रिल २०२४ नुसार जिल्ह्याची मतदारसंख्या ८३ लाख ३८ हजार ७४७ आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

SCROLL FOR NEXT