पुणे

अनधिकृत हॉटेलवर कारवाई

CD

पुणे, ता. ६ : कोथरूड, पौड रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रोड), हडपसर, सोलापूर रस्ता यासह अन्य भागांत महापालिकेच्या बांधकाम विभागाने शनिवारी (ता. ६) कारवाई करून सुमारे ३० हजार चौरस फुटावरील अतिक्रमण काढून टाकले. त्यामुळे इमारतीच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या हॉटेल मालकांना दणका बसला आहे.
महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम केलेले पब, हॉटेल, रेस्टॉरंट, रुफ टॉप हॉटेलांवर कारवाई सुरु केली आहे. कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर रुफटॉप हॉटेल, पबवरील कारवाईत आतापर्यंत सुमारे साडे तीन लाख चौरस फुटावरील अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात आले आहे. कोथरूड येथील हॉटेल आशिष गार्डन चौक परिसर आणि पौड रस्त्यावरील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमणांवर कारवाई झाली. यामध्ये खानदेशी तडका, खाना जंक्शन, ऑक्सिजन कॅफे, ब्ल्युस्टिक पूल, आनंद फास्ट फूड, ममता पराठा, चाय अड्डा, समृद्धी डायनिंग हॉल येथे कारवाई करण्यात आली. हडपसर येथील हांडेवाडी रस्ता, सोलापूर रस्ता, साडे सतरानळी येथील अनधिकृत रुफ टॉप हॉटेल व बार, रेस्टॉरंट अशा ११ ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून सुमारे १९ हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
---

काही भागात अभय
डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, आपटे रस्ता या भागात बांधकाम विभागाने फ्रंट मार्जिनधील हॉटेलवर कारवाई केली, मात्र काही हॉटेलना अभय दिल्याचे चित्र आहे. पार्किंगच्या जागेत फ्रंट मार्जिनध्ये हॉटेल सुरु केल्याने या हॉटेलच्या गाड्या रस्त्यावर लावल्या जात आहेत, तरीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आपटे रस्त्यावर दिसून येत आहे. महापालिकेने कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच तात्पुरते शेड उभारून व्यवसाय सुरु केला जात असल्याचेही समजते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT