पुणे

दोन माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट

CD

पुणे, ता. ६ ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोन माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांनी शनिवारी (ता. ६) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले. या दोन्ही माजी आमदारांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांची लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होती. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीलाही आघाडी कायम राहणार असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पुणे शहरात विधानसभेचे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे, पाच ठिकाणी भाजपचे तर एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे. आगामी निवडणुकीच्या जागा वाटपात काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन, तर ठाकरे गटाच्या वाट्याला दोन जागा येतील, अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे. कोथरूडची जागा ठाकरे गटाला जाणार हे जवळपास निश्‍चित आहे. हडपसर येथे शरद पवार गट आणि ठाकरे गटात रस्सीखेच असणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मोकाटे, बाबर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यास महत्वप्राप्त झाले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात चांगले काम केल्यामुळे साहेबांनी भेटायला बोलावले होते. कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद जास्त आहे. तेथून मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. सर्वजण ताकदीने काम करतील.
चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार

विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. जागा वाटपात हडपसरची जागा कोणाकडे असणार, हे निश्चित झाले नसले, तरी ही जागा आमच्याकडे असावी, असे वाटते. अन्य कोणी निवडणुकीसाठी इच्छुक असेल, तर ते चुकीचे नाही. जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, त्यास निवडून आणले जाईल.
महादेव बाबर, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Ajit Pawar work documentation : अजित पवार यांच्या कार्याचा समृध्द दस्तऐवज तयार होणार, ३५ वर्षातील कार्याला उलगडा होणार

Latest Marathi News Live Update : वर्धा-तुळजापूर दरम्यान जीटी एक्सप्रेसला भीषण आग

Exam Paper Burning: बीडमध्ये कॉपीचे गठ्ठे जाळतानाचे व्हिडिओ समोर; सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई होणार, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ!

Justice for Sahil: "मी त्याला २३ वर्षे एकटीने वाढवलं, जपलं..."; स्टंट करताना स्कॉर्पिओने मुलाला चिरडले, एकट्या आईची न्यायासाठी धडपड

SCROLL FOR NEXT