पुणे

‘व्यवस्थापन’च्या सीईटीसाठी आज शेवटची संधी

CD

पुणे, ता. ७ : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अशा अभ्यासक्रमांच्या अतिरिक्त ‘सीईटी’साठी विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत (ता. ८) नोंदणी करता येणार आहे. नोंदणी प्रक्रियेला मिळत असलेल्या प्रतिसाद लक्षात घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे ‘सीईटी’ सेलने स्पष्ट केले आहे.
बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच ‘सीईटी’ परीक्षा घेण्यात आली. परंतु विद्यार्थी-पालकांना याबाबत माहिती नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षण संस्थांनी प्रवेश परीक्षा कक्षाला व्यक्तीशः भेट देऊन, ईमेल, दूरध्वनी, तसेच अर्जाद्वारे अतिरिक्त परीक्षा घेण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुन्हा या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्याची सुविधा २९ जूनपासून उपलब्ध करून देण्यात आली. यापूर्वी या ‘सीईटी’च्या नोंदणीसाठी तीन जुलैपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर विद्यार्थी-पालकांकडून मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सीईटी सेलकडे करण्यात आली. याची दखल घेत सीईटी सेलने सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

SCROLL FOR NEXT