पुणे

गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला सहा लाखांचा गंडा

CD

पुणे, ता. ७ : सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची पाच लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला लोहगाव भागात राहायला आहे. एप्रिल महिन्यात सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. चोरट्यांनी महिलेला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा मिळाल्याचे भासविले. तसा संदेश महिलेच्या मोबाईलवर पाठविला. महिलेने परतावा बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. तेव्हा चोरट्यांनी टाळाटाळ सुरू केली. चोरट्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT