पुणे

स. प. महाविद्यालयाच्या वसतिगृहात वीज मीटरला आग

CD

पुणे, ता. ७ : सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील वसतिगृहात वीज मीटरला आग लागल्याची घटना रविवारी (ता. ७) सकाळी घडली. अग्निशमन दलाचे जवान तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्वरित आग आटोक्यात आली. आग लागल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहात भिंतीच्या बाहेरील बाजूस विद्युत पुरवठ्यासाठी वापरात असलेल्या मीटरने पेट घेतल्याने ही आग लागल्याची शक्यता आहे. वीज मीटरने पेट घेतल्याने मोठा आवाज झाला होता. आग लागल्याची माहिती मिळताच वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निरोधक उपकरणांचा वापर केला. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दल आणि महावितरणला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. महावितरणच्या पर्वती विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वीज मीटरची तसेच विद्युत यंत्रणेची पाहणी केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जनता वसाहत केंद्रातील जवान सागर देवकुळे, महेंद्र सकपाळ, उमेश शिंदे, सागर पाटील, विजय वाघमारे यांनी आग आटोक्यात आणली.

दरम्यान, अग्निशमन दलाकडून शहरातील महाविद्यालय, मॉल, शाळा आणि रुग्णालयांच्या परिसरात आग लागल्यास करायच्या उपाययोजना, अग्निरोधक उपकरणांच्या वापराबाबत माहितीपर व्याख्यान तसेच प्रात्यक्षिकांचे नियमित आयोजन केले जाते. या जनजागृतीमुळे गंभीर स्वरूपाच्या घटना रोखण्यास मदत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Gokul Election Heat in Kolhapur : 'गोकुळ'ची धामधूम असतानाही आलात त्याबद्दल तुमचे आभार; मंत्री मुश्रीफांकडून सतेज पाटील यांचा चिमटा

SCROLL FOR NEXT