पुणे

महालक्ष्मी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम

CD

पुणे, ता. ३० ः सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात गुरुवारपासून (ता. ३) होणार आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत दररोज धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
ट्रस्टच्या विश्वस्त व उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.गुरुवारी सकाळी आठ वाजता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्‍घाटन सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते होईल.
संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती व सन्मान सोहळा होणार आहे. उत्सवातील दहा दिवस श्रीसुक्त अभिषेक, श्री विष्णू सहस्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती आदी धार्मिक, महिला कर्मचारी सन्मान, कन्यापूजन, वीरमाता-वीरपत्नी सन्मान आदी सामाजिक आणि शिव-पार्वती विवाह सोहळा, कथकली नृत्य, पोवाडा सादरीकरण, सामूहिक गरबा आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. याप्रसंगी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत नवीन कारागृह उभारणार! एका दिवसात १२०० झोपड्या हटवून प्रशासनाकडे जमीन सुपूर्द; सरकारचा मोठा निर्णय

Organic Indrayani Rice Success: सेंद्रिय इंद्रायणी भातात आंबेगावचा राज्यात डंका; मापोलीचे लक्ष्मण लोहकरे प्रथम, दिगदचे रामचंद्र कारोटे द्वितीय

Maharashtra Rain Update: पावसाची एन्ट्री, अंदमानात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी?

NEET Paper Leakage Case : वाघमारेच्या मदतीने भरला शिकवणी वर्ग; प्राध्यापक मनीषा मांढरेला सीबीआयकडून अटक

Megablock: रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार, मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर ५ दिवस मेगाब्लॉक; कुठं आणि कधीपासून? पाहा वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT