पुणे, ता. ३० : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे रक्तदान शिबिरांचे आयोजन धायरी शाखा व हडपसर शाखा येथे केले होते. यामध्ये धायरी येथे २५१ आणि हडपसर येथे १७० अनुयायांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी संत निरंकारी रक्तपेढी मुंबई, वाय.सी.एम. हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी आणि ससून हॉस्पिटल रक्तपेढी यांनी सहकार्य केले. या शिबिराचे उद्घाटन मिशनचे पुणे विभागप्रमुख ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते झाले. करमचंदानी म्हणाले की, रक्तदान हीच सर्वांत मोठी मानव सेवा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी पुणे झोनमध्ये मशिनद्वारे दर महिन्याला चार वेळा रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. ज्यामध्ये अनेक रक्तदाते सहभागी होत असतात’’.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.