पुणे

‘पीएमपी’च्या पर्यटन बसला पसंती

CD

पुणे, ता. ८ ः प्रवाशांना पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना कमी दरात भेटी देता यावे यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाने मे २३मध्ये पर्यटन बस सेवा सुरू केली. ही सेवा सात मार्गांवर असून दर शनिवारी व रविवारी ही सेवा सुरू असते. प्रतिप्रवासी ५०० रुपये आकारले जातात. मे २३ ते जून २४ पर्यंत या बससेवेच्या माध्यमातून १३६७ जणांनी प्रवास केला. यातून ‘पीएमपी’ला सहा लाख ८३ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी विविध कार्यालये, कॉलेज, शाळा, औद्योगिक क्षेत्रातील व आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदारांना साप्ताहिक सुटी असल्याने या दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद जास्त असतो. प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सुलभ व माफक दरात होण्याच्या दृष्टीने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेची सुरवात केली होती. यामध्ये पर्यटन स्थळांकरिता वातानुकूलित ई-बसद्वारे विशेष बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी या बस सुरू करण्यात आल्या आहे.

जून महिन्यात सर्वाधिक उत्पन्न
जून महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाची चाहूल लागल्याने पर्यटकांनीन ‘पीएमपी’ बससेवेचा वापर केला. तसेच साप्ताहिक सुट्या, सार्वजनिक सुट्या यासोबतच शाळेलाही सुट्या असल्याने जून महिन्यात ‘पीएमपी’च्या पर्यटन बससेवेला सर्वाधिक चांगला प्रतिसाद मिळाला. जून २४ मध्ये ३१८ प्रवाशांनी प्रवास केला असून यातून सर्वाधिक म्हणजे एक लाख ५९ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

कोणत्या महिन्यात किती उत्पन्न (रुपयांमध्ये)
- मे २०२३ : ४०,५००
- जून २०२३ : १,०३,०००
- जुलै २०२३ : ६३,५००
- ऑगस्ट २०२३ : १,१०,५००
- सप्टेंबर २०२३: ४०,०००
- ऑक्टोबर २०२३ : २१,०००
- नोव्हेंबर २०२३ : १४,०००
- डिसेंबर २०२३ : ४२,५००
जानेवारी २०२४ : २७,५००
फेब्रुवारी २०२४ : २८,०००
मार्च २०२४ : ---------
एप्रिल २०२४ : -----------
मे २०२४ : ३४,०००
जून २०२४ : १,५९,०००
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

SCROLL FOR NEXT