पुणे

अजित पवार, सुळे यांनी समोरासमोर येणे टाळले

CD

काटेवाडी, ता. ७ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (ता.७) काटेवाडी येथे दुपारच्या विश्रांतीसाठी विसावला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सोहळ्यात सहभागी झाले. पालखी सोहळ्यामध्ये खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या होत्या. मात्र, या दोघांनीही समोरासमोर येणे टाळले.
पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा प्रत्येकाला अधिकार अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. वारीमध्ये एक वेगळा आनंद मिळतो. उत्साह असतो. तो अनुभवण्यासाठी मी वारीमध्ये सहभागी झालो. इतर कोणी त्यामध्ये सहभागी होत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
अर्थसंकल्पाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, अतिशय विचारपूर्वक अर्थसंकल्प आम्ही मांडलेला आहे. ७.५ हॉर्सपॉवरच्या विद्युत पंपात शेतकऱ्यांसाठी वीजबिलात माफी, दीड हजार रुपये प्रतिमहिना महिलांसाठी आणलेली योजना, उच्च शिक्षणाबाबत मुलींसाठी केलेली फी माफी हे करत असताना आम्ही कुणाच्याही हातात पैसे दिले नाहीत. थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कसे पैसे जमा होतील याकडे लक्ष दिलेले आहे.

महिलांसाठी राबवलेल्या योजना यामुळे मला वारी सोहळ्यामध्ये अनेक महिला वारकरी भेटल्या. या योजना चांगल्या आहेत असे म्हणून त्यांनी स्वागत देखील केले. पारदर्शकपणे या योजना कशा राबवत या येतील याकडे देखील आम्ही लक्ष देणार आहे. वारकरी महामंडळामध्ये कोणतेही राजकीय व्यक्ती सहभागी होणार नाही. या महामंडळाला दिलेल्या निधीबाबत त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे. त्यामध्ये राजकारण येणार नाही.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT