पुणे

उड्डाणपुलाचे ६५ टक्के काम पूर्ण

CD

पुणे, ता. ९ : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या पुणे विद्यापीठ चौकातील (आचार्य आनंदऋर्षी चौक) उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे. आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आणखी पाच महिने वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्प आणि गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण, बाणेर आणि औंधकडे सुरळीत वाहतुकीसाठी पुणे विद्यापीठ चौकात उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. गणेशखिंड रस्त्यावरील ई स्केवर आणि बाणेर येथे ज्या ठिकाणी पूल उतणार आहे त्या ठिकाणच्या खांबांचे काम पूर्ण झाले आहे.

मुख्य चौकात उड्डाणपुलाचा खांब असल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यावर पर्याय म्हणून या चौकात एकही खांब न उभारता दोन पिलर्समध्ये ५५ मीटर लांबीचे आणि सुमारे १८ ते २० मीटर रुंदीचे लोखंडी गर्डरचे स्पॅन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. हा दुमजली उड्डाणपूल असल्याने ३२ खांब असून ते उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, ‘पीएमआरडीए’ आणि मेट्रो प्रकल्प समन्वयक

घटनाक्रम
-१४ जुलै २०२० रोजी अस्तित्वातील उड्डाणपूल पाडला
- मेट्रो प्रकल्प आणि उड्डाणपुलाच्या कामासाठी टाटा कंपनीबरोबर २५ नोव्हेंबर २०२१ रोजी करार
- मेट्रो प्रकल्प ३६ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे बंधन
- परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने ऑक्टोबर २०२३ मध्ये दुमजली पुलाचे काम सुरू
- आतापर्यंत उड्डाणपुलाचे ६५ टक्के काम पूर्ण
- उड्डाणपूल उभारण्यासाठी डिसेंबर २०२४ अखेरची मुदत
- उड्डाणपुलाचा अंदाजित खर्च २५० कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT