पुणे, ता. ३० : वाचन संस्कृती नव्या पिढीत संक्रमित करण्यासाठी प्रकाशकांनी परस्पर सहकार्याची भूमिका घ्यावी आणि संघटितपणे वाचकांपर्यंत पोहचावे, असा सूर ‘भारतीय विचार साधना’तर्फे आयोजित प्रकाशक मेळाव्यात उमटला. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बापट मेळाव्याचे बीजभाषण यांनी केले. दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे कार्यवाह मकरंद मुळे, दिलीपराज प्रकाशनाचे राजीव बर्वे, लाखे प्रकाशनाचे चंद्रकांत लाखे, आदित्य प्रकाशनाचे विलास फुटाणे, साकेत प्रकाशनाचे साकेत भांड, भारतीय विचार साधनेचे काशिनाथ देवधर यांनी प्रकाशन व्यवसायाची सद्य:स्थिती मांडली. प्रकाशन व्यवसायापुढील आव्हाने आणि संधी यावर चर्चा झाली. साहित्य अकादमीचे सदस्य प्रा. नरेंद्र पाठक यांनी साहित्य संमेलनात केवळ पुस्तक विक्रेते म्हणून सहभागी न होता आयोजनात सक्रिय होण्याचे आवाहन प्रकाशकांना केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.