पुणे

आरोपींनी केला होता गोळीबाराचा सराव

CD

पुणे, ता. ३० ः राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज चांदेकर यांचा खून करण्यापूर्वी आरोपींनी पूर्वतयारी म्हणून पिस्तुलातून गोळीबाराचा सराव केला होता. ते ठिकाण कळावे म्हणून चौकशी सुरू असून या प्रकरणी आणखी आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
आरोपी सागर राजेंद्र पवार (वय ३२, रा. नऱ्हे), साहिल ऊर्फ टक्या नीलेश दळवी (वय १९, रा. धनकवडी) आणि प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (वय ३३, रा. नाना पेठ) यांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी (ता. ३०) संपली. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांची पोलिस कोठडीत पाच ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली. इतर बारा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा आदेश दिला.
सागर, साहिल आणि प्रसाद यांची पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. गुन्ह्यासाठी रचलेला कट, पूर्वतयारी आणि अंमलबजावणी या अनुषंगाने पोलिस कोठडीतील गणेश लक्ष्मण कोमकर आणि टोळीप्रमुख सोमनाथ सयाजी गायकवाड यांच्यासह या तीन आरोपींची चौकशी करायची आहे. त्यांच्याकडून दहा कोयते जप्त करण्यात आले असून आणखी तीन कोयते जप्त करायचे आहेत. आरोपींना पिस्तूल खरेदीसाठी कोणी आर्थिक मदत केली, त्यांनी गोळीबाराचा सराव कुठे केला याची चौकशी सर्व आरोपींच्या समोरासमोर करायची आहे, असा युक्तिवाद ॲड. बोंबटकर यांनी केला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

SCROLL FOR NEXT