पुणे

मुलांना आवडत्या शिक्षिका मिळाल्या परत

CD

पुणे, ता. ९ : पुण्यातील एका शाळेतील शिक्षिकेला शिकविताना व्हेरिकोज व्हेन्समुळे पायांमध्ये प्रचंड वेदना होत होत्या. दिवसभर उभे राहून शिकवल्याने रात्री झोप येत नव्हती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी केली. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी या शिक्षिकेला उपचाराचा मार्ग दाखविला आणि मुलांना आवडत्या शिक्षिका परत मिळाल्या.
हिलिंग हँड्स क्लिनिकचे लेझर व्हेरिकोज व्हेन्स सर्जन डॉ. परेश गांधी म्हणाले, “त्यांना होणारा त्रास, त्यांना जाणवणारी लक्षणे आणि वैद्यकीय तपासणी यातून व्हेरिकोज व्हेन्स आजार असल्याचे निदान झाले. त्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया केल्याच्याच दिवशी त्यांना चालता आले. जिन्यावरून चढ-उतार करणे शक्य झाले. त्यांच्या वेदना कमी झाल्या. त्यामुळे जूनपासून सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात त्या शाळेत रुजू झाल्या.”

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?
या आजारात रुग्णाच्या पायाच्या मागील बाजूच्या नसा फुगतात. त्या निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या दिसू लागतात. व्हेरिकोज व्हेन्स हा आजार कोणालाही होऊ शकतो. विशेषतः प्रौढावस्थेत आणि गर्भवतींमध्ये याचे निदान होण्याचे प्रमाण जास्त आहे.

कशामुळे होतो?
याचे मुख्य कारण म्हणजे नसांमधील झडपांमध्ये बिघाड होतो. रक्तप्रवाह हृदयाकडे पोहचविणे हे या झडपांचे मुख्य कार्य असते. त्यामुळे नसांमधून रक्त मागे येत नाही. हे कार्य बिघडल्याने हृदयाकडे जाणारे रक्त नसांमध्ये साचायला लागते. त्यातून व्हेरिकोज व्हेन्स होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT