पुणे

शंभर गोशाळांना चाऱ्याचे वाटप

CD

पुणे, ता. ८ : ‘गोमाता चारा खा.. पाणी पी आणि सुखी रहा’ हा आगळावेगळा उपक्रम महा एनजीओ फेडरेशनने सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शंभर गोशाळांना चाऱ्याचे वाटप करण्यात आले. गोमातांना उन्हाच्या वाढत्या झळा देखील सोसाव्या लागल्या. अनेक ठिकाणी दुष्काळामुळे चारा-पाणी मिळत नव्हते. त्यामुळे हे अभियान राबविण्यात आले. यासाठी ठाण्याचे सी. एल. राठी आणि परिवाराने मोठे योगदान दिले. याशिवाय राज्यातील अनेकांची मदत लाभल्याची माहिती फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील श्री बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट येथे ४५० हून अधिक खिलार, गीर आदी जातींच्या गोवंशांची सोय करण्यात आली. तेथे रोज सुमारे सहा टन चारा लागतो, ज्याचा खर्च सुमारे १० हजार रुपये आहे. लीला मणियार यांनी ५० हजार रुपये किमतीचा चारा उपलब्ध करून देत उपक्रमाला प्रारंभ झाला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

SCROLL FOR NEXT