पुणे

‘कायदे बदलामुळे न्याय प्रक्रिया अधिक सुलभ’

CD

पुणे, ता. ९ : ‘‘भारतीयांचे स्वातंत्र्य अबाधित राखणारे कायदे हवेत, असा विचार पुढे आल्याने कायद्यात बदल करण्यात आला आहे. हा केवळ कॉस्मेटिक बदल नसून, संपूर्ण कायद्यामध्येच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. कोणताही बदल घडताना थोडा त्रास होणारचं. मात्र या बदलामुळे संपूर्ण न्याय प्रक्रिया अधिक सुलभ होऊन गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार आहे,’’ असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. के. जैन यांनी व्यक्त केले.
पुणे बार असोसिएशनच्यावतीने ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ यांचे तुलनात्मक विश्लेषण’ याविषयावर ॲड. जैन यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ॲड. जैन म्हणाले, ‘‘नवीन कायद्याची काही गरज होती का? जे कायदे आहेत त्यातच बदल करता आला नसता का? असे प्रश्न वकिलांकडून उपस्थित केले जात आहेत. पण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, ब्रिटिशांनी भारतीयांना दाबण्यासाठी कायदे अस्तित्वात आणले होते. आपल्याला हवे तसे कुणी वागले नाही तर दंडुकशाहीचा वापर करायचा यासाठी भारतीय दंड विधान कायदा आणला होता. काळानुरूप कायद्यात बदल होणे आवश्यक होते. भारतीय दंड विधान कायद्यात बदल केला तर फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्यात देखील बदल करावाच लागतो. कारण सर्वच कायदे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांची दखल घेत हे प्रकार कमी कसे होतील याचा विचार बदलांत करण्यात आला आहे.’’
याप्रसंगी पीबीएचे अध्यक्ष ॲड. संतोष खामकर, उपाध्यक्ष ॲड. कुमार पायगुडे, ॲड. पवन कुलकर्णी आणि तपासनीस ॲड. श्रध्दा कदम उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT