Bariatric surgery on a 106 kg girl Sakal
पुणे

Bariatric Surgery : 106 किलो वजनाच्या मुलीवर बेरिॲट्रिक शस्त्रक्रिया

ती ९ वर्षांची असल्यापासून तिचे वजन वेगाने वाढू लागले. गेल्या तीन वर्षांमध्ये वजन वाढल्याने तिला तिचीच दैनंदिन कामेही करता येत नव्हती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील अवघ्या १२ वर्षांच्या मुलीचे वजन १०६ किलोपर्यंत वाढले होते. जीवनशैलीमध्ये बदल करून, आहार नियंत्रण, औषधे या कोणत्याच उपायांनी वजन कमी होत नव्हते. अखेर तिच्यावर वजन कमी करण्याची बेरिॲट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तिचे वजन सध्या ८६ किलोपर्यंत कमी झाले आहे.

ती ९ वर्षांची असल्यापासून तिचे वजन वेगाने वाढू लागले. गेल्या तीन वर्षांमध्ये वजन वाढल्याने तिला तिचीच दैनंदिन कामेही करता येत नव्हती, अशी माहिती मुलीच्या नातेवाइकांनी दिली.
शस्त्रक्रिया करण्यापूर्वी फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिचा आहार बदलला होता. खाण्यावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच नियमित व्यायामही तिने गेल्या काही महिन्यांपासून सुरू केला होता. जीवनशैलीत आमूलाग्र बदलदेखील सुरू होता.

त्याच्या सोबतीला वजन कमी करण्याची औषधेही सुरू होती. मात्र, त्या औषधांमुळे तिला मळमळ होऊ लागली. त्यामुळे काही दिवसांमध्येच ती बंद केली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खराडीमधील मणिपाल हॉस्पिटलचे बॅरिॲट्रिक सर्जन डॉ. सुधीर जाधव म्हणाले, “अवघ्या १२ वर्षांच्या मुलीवर वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सखोल वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. बालरोग तज्ज्ञ, एन्डोक्रोनोलॉजिस्ट्स आणि वैद्यकीय तज्ज्ञ यांच्या सल्ल्यानंतर ‘स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी’ करण्याचा निर्णय घेतला.”

ते म्हणाले, “साधारणपणे या मुलीच्या वयानुसार तिचे वजन ४० ते ४५ किलोच्या दरम्यान असले पाहिजे. त्यासाठी शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय होता. या शस्त्रक्रियेत पोटाचा आकार कमी केला जातो. त्यामुळे अन्न कमी खाल्ले जाते. त्यातून वजन कमी होते. शस्त्रक्रियेनंतर वेळोवेळी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गेल्या तीन महिन्यांत तिचे वजन हे १०६ किलोवरून ८६ किलोपर्यंत कमी झाले आहे. आता ती तिचे साधारण जीवन जगत आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT