पुणे

शहरात लुटमारीच्या घटना सुरूच

CD

पुणे, ता. ९ : पादचारी तरुणाला दगड मारून चोरट्यांनी त्याच्याकडील नऊ हजार रुपयांची रोकड लुटण्याची घटना हडपसर भागातील हांडेवाडी परिसरात घडली. या घटनेत तरुण जखमी झाला आहे. तर कोरेगाव पार्क परिसरात साधू वासवानी पुलाजवळ पादचाऱ्याला लुटल्याची घटना घडली. चोरट्यांनी पादचाऱ्याला धमकावून त्याच्याकडील सोनसाखळी, अंगठी असा ८० हजारांचा ऐवज लुटला. याबाबत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हडपसर भागातील इनामदारनगर परिसरातून अल्लाउद्दीन सिद्दीकी (वय ३९, रा. हांडेवाडी, हडपसर) गुरुवारी (ता. ४) रात्री अकराच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना दगड फेकून मारला. यामध्ये सिद्दीकी जखमी झाले. सिद्दीकी यांच्या खिशातील नऊ हजारांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. याबाबत सिद्दीकी यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. डी. जाधव तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत, कोरेगाव पार्क भागातील साधू वासवानी पुलाजवळ एकाला अडवून चोरट्यांनी गळ्यातील सोनसाखळी आणि अंगठी असा ८० हजार रुपयांचा ऐवज लुटला. याबाबत विठ्ठल देसाई (वय ५८, रा. आंबेगाव) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देसाई सोमवारी (ता. ८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास साधू वासवानी पुलाजवळून निघाले होते. त्यावेळी चोरटे मोटारीतून तेथे आले. मोटारीत तीन महिला आणि साथीदार होते. चोरट्यांनी त्यांच्याकडे पत्ता विचारण्याचा बहाणा केला. चोरट्यांनी देसाई यांना बोलण्यात गुंतवून सोनसाखळी आणि अंगठी असा ८० हजारांचा ऐवज काढून घेतला.

ज्येष्ठाची सोनसाखळी चोरीला
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील ५५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेली. ज्येष्ठाने याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक सांगलीतील वाळवा परिसरातील रहिवासी आहे. बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५५ हजारांची सोनसाखळी चोरून नेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT