पुणे, ता. २ ः सारथ्य फाउंडेशनतर्फे भारतीय नेमबाजी संघाच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे, अंजली भागवत आणि पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांचा सत्कार १० ऑक्टोबरला कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे करण्यात येणार असल्याची माहिती सारथ्य फाउंडेशनचे प्रसन्न कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फाउंडेशनसाठी निधी संकलनाच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून सारथ्य फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या गाण्यांचा आणि मुलाखत असलेला ‘रंग उषेचे’ हा कार्यक्रम सत्कार समारंभाच्या दिवशी रात्री ९.३० वाजता होणार आहे. सर्व दानशूर नागरिकांनी, हितचिंतकांनी व क्रीडाप्रेमींनी या कार्यक्रमाला हजर राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.