पुणे

‘गोदाम बांधण्यासाठी अनुदानाकरिता अर्ज करावेत’

CD

पुणे, ता. १० : अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत गोदाम बांधकामासाठी कृषी विभागाकडून अनुदान देण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्याकरिता २५० मेट्रीक टन गोदाम बांधकामासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्यासाठी २ व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गळीतधान्यासाठी एका गोदाम बांधकामाचे उद्दिष्ट प्राप्त आहे. त्यासाठी प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी कमी असलेली अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
ही योजना बँक कर्जाशी निगडित असल्याने अर्जदारांनी प्रस्ताव सादर करताना केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी, संघ या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करताना महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिझाईन्स, तपशील व खर्चाच्या अंदाजपत्रकासह अर्ज सादर करावेत, असे आवाहनही विभागातर्फे करण्यात आले आहे.
शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी अर्जासोबत सभासद यादी, मागील वर्षीचे ऑडिट रिपोर्ट व ७/१२, ८ अ उतारा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT