पुणे

दीड हजार मद्यपींचे वाहन परवाने निलंबित

CD

पुणे, ता. १० : बेदरकारपणामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शहर परिसरात पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर कारवाई तीव्र केली आहे. दीड महिन्यात एक हजार ६८४ मद्यपींवर कारवाई केली असून, त्यांचे वाहन परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहेत.
कल्याणीनगर येथे झालेल्या भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कारवार्इत वाढ करण्यात आली होती. मद्य पिऊन वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. तात्पुरता परवाना निलंबित केल्यानंतर पुन्हा मद्य पिऊन वाहन चालविल्याचे आढळून आल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.
२१ मे ते ८ जुलै या कालावधीत एक लाख ५८ हजार २६९ बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२ कोटी २१ लाख ९३ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मद्य पिऊन वाहन चालविणे, भरधाव वाहन चालविणे, क्रमांक नसलेले वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने जाणे अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

शहरात मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. एक जानेवारी ते ३० जून या कालावधीत १६८४ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. परवाना निलंबित केल्यानंतर पुन्हा मद्य पिऊन वाहन चालविताना चालक आढळून आल्यास कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात येणार आहे. तशी तरतूद कायद्यात आहे.
-रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: तळेगावात रस्त्याच्या मधूनच उसळला पाण्याचा प्रचंड फवारा... सर्व भयभीत... थरारक अन् अचंबित करणारा प्रकार

पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांच्या नातवाचे कांड, परदेशी महिलांच्या व्हिसाची सोय केली, देशात येताच अपहरण अन् अत्याचार

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन

IND vs ENG: 'त्या एका षटकाने सामना फिरला'; पराभवानंतर श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य, रवी बिश्नोईबाबत काय म्हणाला?

Ayodhya Ram Mandir: राममंदिरासाठी ‘सीईओं’ची नियुक्ती शक्य; ट्रस्टची सोमवारी बैठक; ‘एसआयटी’ अहवालावरही चर्चा

SCROLL FOR NEXT