पुणे

‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण वर्ग

CD

‘एफपीसी’ची नोंदणी पूर्ण होताच या कंपनीला सीईओ (किंवा व्यवस्थापक) नियुक्त करणे आवश्यक असते. भारतामध्ये आजघडीला ४० हजारांहून अधिक ‘एफपीसीं’ची नोंदणी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारपासून (ता. १३) पाच दिवसांचे ‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण आयोजित केले आहे. शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, कृषी व्यवसाय मूल्यसाखळी, शेतमाल पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, कर प्रणाली, व्यवसाय आराखडा स्वरूप, बुक कीपिंगचे महत्त्व, शासकीय योजनांची ओळख आणि या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषीसह इतर शाखेतील पदवीधर, एफपीसी संचालक तसेच एफपीसी नोंदणी करू इच्छिणारे शेतकरी यांच्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
संपर्क : ८४८४८२२३७७

शिका जर्मन भाषा
जर्मन ही अशी आंतरराष्ट्रीय भाषा जी शिकल्याने भरपूर करिअर संधी उपलब्ध होतात. याचे कारण जर्मनी ही युरोपची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि कॉर्पोरेशन हे जर्मन आहेत. भारत ही त्यांची वाढती बाजारपेठ असल्याने जर्मन भाषा अनुवादक, जर्मन दुभाषी आणि जर्मन प्रशिक्षकांना भारतात नेहमीच मागणी होती आणि पुढेही राहणार आहे. जर्मन शिकल्याने रेझ्युमेला वजन प्राप्त होते आणि नोकरीच्या बाजारपेठेतील रोजगार क्षमता वाढते. जर्मनीमध्ये जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधीही उपलब्ध आहेत. या सर्व संधींचा लाभ घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी जर्मन भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे. जर्मन भाषेचा ६० तासांचा (लेव्हल ए१) प्रमाणपत्र अभ्यासक्रम येत्या शनिवारपासून (ता. १३) सुरू होत आहे.
संपर्क : ९८८१०९९४२६

डिजिटल मार्केटिंग बूट कॅम्प
रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंगची कौशल्ये शिकवणारा विशेष बूटकॅम्प १८ जुलैपासून सुरू होत आहे. डिजिटल मार्केटिंगमुळे कमीत कमी गुंतवणुकीत, ठराविक ग्राहक वर्गापर्यंत अचूकपणे पोहोचता येते. रिअल इस्टेट क्षेत्रात तर ‘मार्केटिंग’चे अधिकच महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित तीन दिवसीय ऑनलाइन बूट कॅम्प आयोजित केला आहे. यामध्ये सर्च, डिस्प्ले, रीमार्केटिंग, युट्युब, सोशल मीडिया, लीड जनरेशन, कन्व्हर्जन, पेज लाइक इत्यादी कॅम्पेन कसे चालवावे, लिंक्डडीन, कॅन्व्हा, चॅटजीपीटी यांचा डिजिटल मार्केटिंगमध्ये कसा उपयोग करावा याची माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा
अनेकदा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो, मात्र तो एडिट करताना अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा १३, १४ आणि २०, २१ जुलै रोजी होणार आहे. कार्यशाळेत एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन लोकप्रिय एडिटिंग साधनांचा वापर करून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडीओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, ऑडिओ ॲडजेस्टमेंट व व्हॉइसओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टीपा या विषयांवर प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळा पूर्ण केल्यास इंटर्नशिपच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
संपर्क : ९१४६०३८०३१

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे
-------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT