पुणे

सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव सुरू

CD

कात्रज, ता. ३ : सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरात धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरा होत आहे. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाचा प्रारंभ शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापनेने शुक्रवारी (ता. ३) सकाळी साडेआठ वाजता करण्यात आला. या वेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्‍वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, विश्‍वस्त अॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित उपस्थित होते.
नवरात्रोत्सवानिमित्त पहिल्या दिवशी तीन ते चार या वेळेत गृहलक्ष्मी श्री सूक्त मंडळाकडून भजन करण्यात आले, तर चार ते पाच या वेळेत प्रतिभा मेंढेकर भजनी मंडळाकडून भजन करण्यात आले. रुद्रगर्जना पथकाकडून वादन, शंखनाद करण्यात आला. संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विद्युत रोषणाईचे उद्‌घाटन सह पोलिस आयुक्त रंजन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. रात्री साडेआठच्या सुमारास राधिका पारकर अँड ग्रुपच्या वतीने महिला सक्षमीकरणावर सादरीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजी राजं म्हणायचं', 'राजा शिवाजी'मधील सलमान खान प्रेक्षकांना प्रचंड भावला, शत्रूंना म्हणाला...

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

Akola News: जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित;पाच केंद्रांना नोटीस; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

SCROLL FOR NEXT