पुणे

हॉटेल वैशालीसह अन्य मिळकतीत जाण्यास मज्जाव

CD

पुणे, ता. ३ ः नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) हॉटेल वैशाली आणि अन्य मिळकतीमध्ये प्रवेश करण्यास हॉटेल मालकाच्या जावयास दिवाणी न्यायालयाने मज्जाव केला आहे. याबाबत हॉटेल वैशालीचे मालक स्व. जगन्नाथ शेट्टी यांची मुलगी निकिता शेट्टी यांनी पती विश्वजित जाधव यांच्याविरोधात न्यायालयात मनाई अर्ज दाखल केला होता. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश डी. जे. पाटील यांनी हा आदेश दिला.
हा अर्ज फेटाळल्यास मालमत्तांचा बळजबरीने ताबा घेतला जाऊन तक्रारदाराचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल, असे नमूद करत हा आदेश देण्यात आला. जाधव यांना हॉटेल आणि अन्य मिळकती तसेच, बँक खात्यांमध्ये व्यवहार करण्यास मनाई करण्यात यावी तसेच, नोंदवून घेतलेले कुलमुखत्यारपत्र आणि त्याद्वारे नोंदविलेले बक्षीसपत्र तसेच, इतर दस्त रद्द करावे, अशी मागणी या दाव्यात केली होती. निकीता यांच्यावतीने अ‍ॅड. संदीप सोहनी, अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. अंकिता वरखडे, ॲड. ऐश्वर्या तिवाटणे यांनी सहकार्य केले. न्यायालयाने तक्रारदार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत मनाई आदेश जारी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

आता 'या' दुकानांचा परवाना रद्द होणार, बदलापूर नगरपालिकेचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : महिला आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा; निवडणुकांत पराभूत करण्याचे आवाहन

ई-सेवा केंद्र चार दिवसांपासून ठप्प, शासकीय दाखले रखडल्यामुळे पालकांची तारांबळ

पंजाब किंग्सने लाथाडलेला फंलदाज लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात दाखल होतोय

SCROLL FOR NEXT