

Josh Inglis
esakal
Josh Inglis Joins the Squad: इंडियन प्रीमियर लीग २०२६(IPL) चा हंगाम चांगला सुरू आहे. अशातच आता लखनऊ सुपर जायंट्ससाठी(Lucknow Super Giants) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या ताफ्यात आता ८.६ कोटींचा खेळाडू सामील होणार आहे. हा खेळाडू अखेर संघात सामील होण्यासाठी भारतात दाखल झाला आहे. त्याच्या येण्यामुळे लखनऊ संघाला चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे.