पुणे

‘टपाल’मार्फत दिवाळीचा फराळ जाणार परदेशात

CD

पुणे, ता. ३ : परदेशातील नातेवाइकांना दिवाळीच्या फराळाचा आनंद मिळावा, म्हणून फराळ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी टपाल विभाग सज्ज झाला आहे. तसेच, नागरिकांसाठी घरी येऊन विनामूल्य फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधाही टपाल विभागाने उपलब्ध केली आहे. फराळाचे पदार्थ दिल्यानंतर ते पॅकिंग करून माफक दरात परदेशात पाठविण्यात येणार आहे.
नोकरी आणि शिक्षणानिमित्त पुण्यातून परदेशामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येकालाच दिवाळीच्या सणासाठी भारतामध्ये येणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन जगभरात फराळाचे पदार्थ आणि भेटवस्तू पोहोचवण्यासाठी टपाल विभागाने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये दिवाळी फराळ परदेशामध्ये पाठविण्याची सुविधा तसेच, तेथे फराळाचे पॅकिंग करण्याची सोयही उपलब्ध आहे. गेल्यावर्षी दिवाळीनिमित्त सात हजार ५०० किलो फराळ पुण्यातून परदेशात अगदी वेळेत पाठविण्याचा विक्रम करण्यात आला होता.
पुणे शहरातील जी. पी. ओ. पुणे शहर मुख्य पोस्ट कार्यालय, चिंचवड ईस्ट, मार्केट यार्ड, पर्वती आणि इतर मोठ्या टपाल कार्यालयात फराळाच्या पदार्थांच्या बॉक्सचे पॅकिंग करण्यासाठी उपकरणे बसवली आहेत. त्याद्वारे काही मिनिटांमध्ये फराळ आणि भेटवस्तूंचे पॅकिंग करून हा बॉक्स लगेचच परदेशात पाठविला जातो.

संपर्कासाठी...
पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये म्हणाले की, दिवाळी फराळ आपल्या नातेवाइकांना आणि मित्र-मैत्रिणींना पाठवावा. दिवाळीपर्यंत फ्री पिकअपच्या सेवेसाठी संपर्क ः ९८३४४८२१०५ आणि ७०२८००७२३५. सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत करावा. या सेवेचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जय शिवराय! 'या' सिनेमागृहात 'राजा शिवाजी' सिनेमा मोफत पाहता येणार, पहा संपूर्ण यादी

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

SCROLL FOR NEXT