पुणे

हडपसर- झाशी रेल्वे रविवारपासून धावणार

CD

पुणे, ता. ३ : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हडपसर ते वीरांगना लक्ष्मीबाई झाशी दरम्यान उत्सव विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हडपसर ते झाशीदरम्यान १८ फेऱ्या होणार असून, रविवारपासून (ता. ६) सेवेला सुरुवात होणार आहे.
हडपसर-वीरांगना लक्ष्मीबाई झाशी (गाडी क्रमांक०१९२३) ही रेल्वे हडपसर येथून ६ ऑक्टोबर ते १ डिसेंबर दरम्यान धावेल. हडपसरहून दर रविवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी गाडी सुटेल. झाशीला पुढच्या दिवशी मध्यरात्री १ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. तर वीरांगना लक्ष्मीबाई झाशी (गाडी क्रमांक ०१९२४) ही झाशीहून दर शनिवारी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. हडपसरला दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान ही सेवा असणार आहे. दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ आणि बीना आदी स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : राज्यभरात उष्माघाताच्या 115 रुग्णांची नोंद

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT