पुणे

तक्रारी परस्पर बंद करण्याच्या प्रकाराला चाप

CD

पुणे, ता. ३ ः नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण झालेले नसूनही त्या परस्पर बंद करण्याच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आता चाप बसणार आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचा अभिप्राय घेतल्यानंतरच त्या बंद करण्याचा आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
शहरातील रस्ते, पाणी, सांडपाणी, क्रीडांगणे, शाळा यांसह दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत नागरिक तक्रार करतात. त्यासाठी महापालिकेच्या ‘पीएमसी केअर अॅप’, ‘एक्‍स’ सह विविध समाजमाध्यमे तसेच दूरध्वनीचा वापर केला जातो.
तक्रार आल्यानंतर ती संबंधित विभागाकडे पाठविली जात होती. त्यानंतर कार्यवाही केली जात होती. तक्रारी सुटल्या नसतानाही आणि मुळात त्या सोडविण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नसतानाही काही विभाग त्या परस्पर बंद करण्याचा प्रकार सुरू होता. काही नागरीकांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून हा प्रकार निदर्शनास आणून दिला होता.
दुसरीकडे ‘पीएमसी केअर अॅप’ संबंधीच्या तक्रारींचा पाढाही थांबत नव्हता. या प्रकाराची अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दखल घेतली. तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीची तक्रारदारास महापालिकेच्या कॉल सेंटरमधून दूरध्वनी करून माहिती द्यावी आणि त्याचा अभिप्राय नोंदविल्यानंतरच तक्रार बंद करावी, असा आदेश त्यांनी दिला.
---------
नागरिकांकडून विविध प्रकारच्या समस्यांबाबत ‘पीएमसी केअर अॅप’वरून तक्रारी केल्या जातात. काही तक्रारींवर कार्यवाही न होताच त्या बंद केल्या जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले. त्यावरुन तक्रारीबाबतची माहिती देऊन नागरिकांचा अभिप्राय घेण्यास सुरवात केली आहे.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT