पुणे

‘मसाप’ची कार्यकारीणी घटनाबाह्य

CD

पुणे, ता. ५ : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत २०२१मध्येच संपुष्टात आली. या कार्यकारिणीने वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडलेला पाच वर्षांच्या मुदतवाढीचा ठराव घटनाबाह्य असून, पर्यायाने ही कार्यकारिणीही घटनाबाह्य आहे. त्यामुळे परिषदेची निवडणूक जाहीर करावी’, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीतर्फे करण्यात आली.
संरक्षण कृती समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली. याप्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष प्रा. धनंजय कुलकर्णी आणि निमंत्रक शशांक महाजन उपस्थित होते. ‘मसाप’चा कारभार संस्थेच्या घटनात्मक तरतुदींनुसार व लोकशाही मार्गाने व्हावा, यासाठी ही समिती स्थापन केल्याचे कांबळे यांनी सांगितले. समितीच्या या आरोपांबाबत ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
कांबळे म्हणाले, ‘‘मसापच्या विद्यमान कार्यकारिणीने मांडलेला हा मुदतवाढीचा ठराव बेकायदेशीर आहे. त्यामुळे लगेचच निवडणूक जाहीर करावी. याबाबतची याचिका विजय शेंडगे या सभासदाने धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. मात्र कार्यकारिणीची मुदत तीन वर्षांपूर्वीच संपुष्टात आल्याने या याचिकेवरील निर्णयाची वाट न पाहता निवडणूक जाहीर करावी, अशी आमची मागणी आहे. ही निवडणूक धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षण अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली घेण्यात यावी.’’
धनंजय कुलकर्णी म्हणाले, ‘‘कोरोनाचे कारण देत मुदतवाढीचा ठराव करण्यात आला. मात्र, कोरोनाची तीव्रता कमी होत असतानाही वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आलेला ठराव संस्थेच्या घटनेच्या विरोधात आहे. या ठरावाला अद्याप धर्मादाय आयुक्तांनी मान्यताही दिलेली नाही. त्यामुळे विद्यमान कार्यकारिणीच बेकायदेशीर आहे. या कार्यकारिणीने अनेकांचे सभासदत्वाचे अर्जही प्रलंबित ठेवले आहेत.’’

साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्याकडे हस्तांतरित होणार आहे. मात्र, ही कार्यकारिणी बेकायदेशीर असल्याने मसापची निवडणूक होईपर्यंत महामंडळ स्थलांतरित करू नये, अशी मागणी करणारे पत्र आम्ही महामंडळाच्या विद्यमान अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांना दिले आहे.
-धनंजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष, मसाप संरक्षण कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT