पुणे

एसआयआयएलसी

CD

दिवाळी विशेष हँडमेड सोप मेकिंग कार्यशाळा
दिवाळी विशेष बेसिक टू ॲडव्हान्स हँडमेड सोप मेकिंग कार्यशाळा रविवारी (ता. ६) होणार आहे. कार्यशाळेत पपई, काकडी, लिंबू, कोरफड अशा नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले अँटी-एजिंग, त्वचा उजळवणाऱ्या, पेडीक्यूअर आणि सिजनल सोप अशा प्रकारचे साबण बनवण्याच्या पद्धती शिकवल्या जातील. तसेच या वर्कशॉपमध्ये त्वचेचे प्रकार, साबणासाठी वापरले जाणारे बेस, रंग, सुगंध, तेल, औषधी वनस्पती यांची इत्थंभूत माहिती दिली जाणार आहे. पपाया कुकुम्बर, ॲलोवेरा, लेमन, व्हिटॅमिन ई, रोज क्रीम, किड्स थीम, डिझायनर, सॅफरॉन सॅण्डलवूड, मॉइश्चरायझिंग बटर, डिटॉक्स चारकोल ग्लो, ओट्स, पेडिक्योर, मेन्थॉल ब्लास्ट, अँटी ॲक्ने, अँटी एजिंग, गोल्ड फेशियल बॉम्ब, स्किन लाइटनिंग, उबटन ग्लो, व्हाइटनिंग आणि सणांसाठी सिझनल साबण हे प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येणार आहेत. दिवाळीत गिफ्ट हॅम्परची विक्री करण्याच्या दृष्टीने साबणासाठी लागणारा कच्चा माल, व्हेंडर्स, पॅकिंग आणि कॉस्टिंग यांची माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

कृषीतील विविध उद्योग, रोजगार संधींबाबत मार्गदर्शन
पदव्युत्तर शिक्षणाच्या वा अभ्यासक्रमाच्या शोधात असणाऱ्या तसेच स्वतःचे स्टार्टअप, उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या, रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर विनामूल्य कार्यशाळा रविवारी (ता. ६) होणार आहे. पदवीनंतर अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा किंवा इतर अनेक क्षेत्रात करिअरचा प्रयत्न करतात. मात्र कृषी हे एक असे करिअर क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रातील उद्योग व नोकरीच्या संधींविषयी बहुतांश विद्यार्थ्यांना विशेष माहिती नसते. या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा आयोजिली आहे. अनेकांना स्वतःचा स्टार्टअप तर अनेकांना चांगल्या पगाराचा जॉब हवा असतो. परंतु फक्त पदवी घेऊन ही उद्दीष्टे साध्य होत नाहीत. त्यासाठी स्वतःमध्ये आवश्यक ती कौशल्य व उद्योजकता विकसित करावी लागते. याचे सविस्तर मार्गदर्शन कार्यशाळेत होणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योग, कमर्शिअल शेती उद्योग, शेतमाल निर्यात उद्योग, कृषीतील इतर रोजगार संधी आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क ः ८४८४८२२१६६

महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर धडक कारवाई करत तब्बल २० हजार एजंटची नोंदणी महारेराने नुकतीच रद्द केली आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नुतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नुतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाईन व ऑफलाईन बॅच १४ ऑक्टोबर रोजी सुरु होत आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटॉरशिप प्रोग्रॅम
ज्या लोकांना रिअल इस्टेट क्षेत्रात कौशल्य प्राप्त करायचे आहे, ज्यांना अतिशय श्रीमंत जीवनशैली जगण्याची इच्छा व स्थिर व्यवसाय हवा आहे, अश्यांसाठी तीन महिन्यांचा रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटॉरशिप प्रोग्रॅम १४ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. महारेराची अधिकृत प्रशिक्षण संस्था असणाऱ्या ‘एसआआयएलसी’तर्फे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रोग्रॅमसाठी शिक्षणाचे कोणतेही निकष नाहीत. करिअरच्या संधी शोधत असलेल्या सर्वच तरुणांसाठी अतिशय आदर्श असे हे प्रशिक्षण असणार आहे. रिअल इस्टेट मास्टर ट्रेनर रोहित गायकवाड हे प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक असणार आहेत. प्रशिक्षणाचे शुल्क प्रतिव्यक्ती चाळीस हजार रुपये अधिक जीएसटी असून याविषयी अधिक माहितीसाठी संपर्क: ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

तू इतकी चांगली आहेस मग... तमन्ना भाटियाला हॉटेलच्या मालकाची पत्नी असं काहीतरी बोलली की... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT