पुणे

सप्टेंबरमध्ये २४ हजार प्रवाशांवर कारवाई

CD

पुणे, ता. ५ : पुणे रेल्वेस्थानक व पुणे विभागातून विनातिकीट, अनियमित तिकीट काढून फिरणाऱ्या सुमारे २४ हजार प्रवाशांवर सप्टेंबरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे ९२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान १ लाख ७१ हजार ४२० प्रवाशांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून सुमारे १० कोटी ७३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
सप्टेंबरमध्ये पुणे विभागात तिकीट तपासणी दरम्यान विनातिकीट प्रवास करताना २० हजार ५६९ प्रवासी आढळून आले. तर अनियमित तिकिटावर प्रवास करताना २९८६, तसेच सामान बुक न करता प्रवास करणारे ३८७ प्रवासी आढळले. अशा सर्व प्रवाशांवर कारवाई करून सुमारे ९२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंत कुमार बेहरा यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

'फक्त ब्रा घालून किसिंग सीन करायला लावायचे' अभिनेत्रीने केली प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोलखोल, म्हणाली, 'प्रत्येक सीनमध्ये इंटिमेन्सी..'

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Pune News : ‘मसाप’मध्ये दहा वर्षांनी सत्तापालट

SCROLL FOR NEXT