पुणे

‘अभिजात’साठी पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे योगदान : गोपाळ तिवारी

CD

पुणे, ता. ४ : ‘‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी भाषा विभागाचे स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले. तसेच अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करून योगदान दिले,’’ असे मत काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने गुरुवारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली. या घोषणेचे महाराष्ट्रातून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर, तिवारी म्हणाले, ‘‘मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळण्यासाठी तत्कालीन सरकारने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यांनी अहवाल तयार करून चर्चा घडवून आणली. हा अहवाल त्यांनी केंद्र सरकारकडे पाठविला होता. या प्रक्रियेत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी भाषा विकसित करण्यापासून ते मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यापर्यंतची कामे केली होती. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद साजरा करतानाच चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

Gas Cylinder Seized : साठेबाजाकडून १९ गॅस सिलिंडर जप्त; ‘सकाळ’च्या वृत्तानंतर पथकाची धडक कारवाई

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT