पुणे, ता. ५ : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील ‘जिल्हा गुणवंत पुरस्कारां’ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील १६, पिंपरी-चिंचवडमधील १२ आणि जिल्ह्यातील ५५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण रविवारी (ता. ६) भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात सकाळी साडेदहा वाजता होणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर आणि सचिव प्रसाद गायकवाड यांनी दिली.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यंदा पुणे शहरात शंकर गोगावले (सेवक-श्री संत तुकाराम माध्यमिक विद्यालय,चंदननगर), डॉ. स्मिता खोपडे (उपशिक्षिका- श्री शिवाजी मराठा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शुक्रवार पेठ), भानुदास रिठे (प्राचार्य- प्रतिभाताई पवार माध्यमिक व हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनिअर कॉलेज, कोंढवा बुद्रूक), सतीश घाणेकर (लेखनिक - सौ. सुंदरदेवी राठी हायस्कूल, पर्वती), अलका माळवे (सहशिक्षिका- रामराज्य माध्यमिक विद्यालय, बिबवेवाडी), दिलीप पवार (कलाशिक्षक- पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी), मेधा सिन्नरकर (माजी प्राचार्या- लक्ष्मणराव आपटे प्रशाला व ज्युनिअर कॉलेज), दीपाली चाचड (मुख्याध्यापिका-घोरपडी व्हिलेज हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज), उज्वला सूर्यवंशी (सहशिक्षिका- श्री म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालय, बालेवाडी), रेखा खेडेकर (पर्यवेक्षिका- मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गणेशखिंड), महादेव जाधव (मुख्याध्यापक- शानू पटेल शाळा, तिरूपतीनगर) आदींना पुरस्कार घोषित झाल्याचे सागर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.