पुणे

बुलडाणा अर्बनतर्फे ११ टक्के लाभांश जाहीर

CD

पुणे, ता. ५ : आशिया खंडामध्ये क्रमांक एकची पतसंस्था असलेल्या बुलडाणा अर्बन बँकेने आपल्या सभासदांना २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ११ टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. ‘मल्टीस्टेट’चा दर्जा प्राप्त असलेली ही संस्था महाराष्ट्रासह इतर आठ राज्यांत कार्यरत असून, त्यांनी एकूण २२ हजार ४०० कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे.
बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक म्हणाले, ‘‘आगामी काळ शेती व्यवस्थेवर अवलंबून असणारा असून, जगभरात अन्नाची गरज वाढत आहे. त्यामुळे शेती उत्पादन साठवून ठेवण्याची क्षमता वाढवावी लागणार आहे. त्याकरिता आगामी काळात आम्ही अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गोदाम शृंखलेला अधिक बळ देणार आहोत.’’
बुलडाणा अर्बनवर सभासद ग्राहकांनी दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल चांडक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी आभार मानले आहेत. लाभांश घेण्यासाठी जवळच्या शाखेशी संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stroke Summit: भारतामध्ये मृत्यूचे चौथे मोठे कारण स्ट्रोक! उपचारांसाठी प्रगत क्रिटिकल केअरची गरज; तज्ज्ञांचे समिटमध्ये मत

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

ज्जे बात ! नोकरांना माज दाखवणाऱ्या अंशुमनला स्वानंदीने चाबकाने फोडलं ; प्रोमो पाहून प्रेक्षकांना आनंद अनावर

SCROLL FOR NEXT