पुणे

गदिमा स्मारकासाठी राज्य सरकार निधी देणार

CD

पुणे, ता. ५ : दिवंगत ग. दी. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या कामासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
कोथरूडमधील महात्मा सोसायटीजवळ महापालिकेतर्फे हे स्मारक उभारण्यात येत आहे. २००७ मध्ये पहिली घोषणा झालेल्या या स्मारकाचे काम संथगतीने सुरू आहे. सध्या येथील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पाटील यांनी शनिवारी स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, भवन विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, भाजपच्या प्रदेश सचिव वर्षा डहाळे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्यांचा सन्मान करणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. गदिमांचे देखणे स्मारक साकारले जावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे महापालिकेने स्मारकाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केल्यास स्मारकाचे सौंदर्य वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू.’’

स्मारकाचा ‘संथ’ प्रवास
- २००७ मध्ये पहिली घोषणा
- वाकडेवाडी येथे नदीकिनारीची जागा आरक्षित, तेथील संरक्षण भिंतीवर तीन कोटी रुपयांचा खर्च
- २०१८मध्ये कोथरूड येथे महात्मा सोसायटीजवळ जागा निश्‍चित
- २०१९मध्ये फेब्रुवारीमध्ये महापालिकेकडून सर्व प्रकारची परवानगी
- मार्च २०२१मध्ये भूमिपूजन
- जानेवारी २०२३मध्ये काम एका वर्षात पूर्ण करण्याची चंद्रकांत पाटील यांची सूचना
- अद्याप केवळ पहिल्याच टप्प्याचे काम सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT