पुणे

सात क्षेत्रीय कार्यालयांवर सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती

CD

पुणे, ता. ५ : विधानसभा निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या पदांवर प्रभारी अधिकारी नियुक्त करता येत नाहीत. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सात क्षेत्रीय कार्यालयांसाठी नव्याने सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती केली आहे.
पुणे महापालिकेची १५ क्षेत्रीय कार्यालय आहेत. त्यापैकी सात क्षेत्रीय कार्यालयांचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातात होता. पण विधानसभा निवडणुकीच्या काळात महत्त्वाचे पद प्रभारी अधिकाऱ्यांकडे असू नये, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यानुसार सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही जणांना बढतीने हे पद दिले आहे.
प्रशासन अधिकारी पदावरील प्रकाश मोहिते यांना पदोन्नती देऊन भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त केले आहे. शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदी बाळासाहेब ढवळे पाटील, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदी विजय नायकाल, वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदी अमोल पवार, ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदी हेमंत किरूळकर, कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदी सुरेखा भणगे यांची नियुक्ती केली आहे.

खलाटे यांचे निलंबन मागे
जुलै महिन्यात मुठा नदीला पूर आल्यानंतर एकतानगरी भागात पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर मदतकार्य व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने आयुक्त भोसले यांनी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित केले होते. निलंबन मागे घेऊन त्यांच्याकडे येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT