सनील गाडेकर
पुणे, ता. ९ : कंपनीत कामाला असताना किंवा नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी किंवा कंपनीशी संबंधित इतर व्यक्तींकडून होणारे डेटा चोरीचे प्रकार माहिती तंत्रज्ञानासह (आयटी) उत्पादन कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे एकीकडे आर्थिक नुकसान तर दुसरीकडे स्पर्धकांकडून गैरफायदा, असे तोटे होतात.
डेटा आयता मिळाल्यामुळे विस्तार करणे सोपे होते, तसेच स्पर्धेत टिकून राहावे म्हणून काही कंपन्याच असे प्रकार करतात. मात्र, ज्या कंपनीतून डेटा चोरी होते त्या कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होतो. डेटा चोरीला गेल्यानंतर कंपनीच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होतात. याबाबतचे काही गुन्हेदेखील जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
कंपन्या करतात हे उपाय
- कर्मचाऱ्यांना कंपनीचा लॅपटॉप आणि इंटरनेट दिले जाते
- मेल आयडीसुद्धा कंपनीच्या नावाचा असतो
- कंपनीच्या सॉफ्टवेअरवर काम करणे बंधनकारक
- कर्मचारी लॅपटॉप आणि इंटरनेटचा वापर कसा करतात, यावर लक्ष ठेवले जाते
अशी होते डेटाचोरी
- डेटा क्लाऊडवर सेव्ह केला जातो
- पेनड्राइव्हमध्ये कॉपी केला जातो
- डेटा केबलचा वापर
डेटा चोरांवर होते ही कारवार्इ
डेटा चोरांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि दिवाणी प्रक्रियेनुसार शिक्षा आणि नुकसानभरपार्इ अशा कारवाईची तरतूद आहे. त्यांच्यावर आयटी व ‘बीएनएस’नुसार गुन्हा दाखल होतो. डेटा चोरणारे आणि चोरलेला डेटा वापरणारे यांच्यावरही कारवार्इ होते. आयटी कायद्याच्या कलम ४३ आणि ४६ नुसार ज्या कंपनीतून डेटा चोरीला गेला आहे ती कंपनी आयटी सचिवांकडे दावा दाखल करून नुकसानभरपार्इ मागू शकते. एक ते पाच कोटी रुपयांपर्यंत नुकसानभरपार्इ देण्याचा सचिवांना अधिकार आहे.
---
डेटा चोरी होऊ नये म्हणून कंपन्या काही उपाययोजना करतात. त्यानंतरही चोरीला गेला तर चोरणारा आणि तो वापरणारा अशा दोघांवर कारवार्इ होते. ही कारवार्इ फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाची असू शकते. कंपन्यांना जेव्हा डेटाचोरीची शंका येते तेव्हा ते अंतर्गत चौकशी करतात. त्यात कुणी दोषी आढळले तर कंपनीच्या नियमांनुसार कारवार्इ होते. डेटा चोरीचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले आहेत.
- ॲड. गौरव जाचक, सायबर तज्ज्ञ
दाखल असलेले गुन्हे
चाकणमधील औद्योगिक परिसरातील एका कंपनीतील माजी अधिकाऱ्यावर डेटा चोरीप्रकरणी गुन्हा दाखल आहे. अजित कुमार बिपिनबिहारी त्रिपाठी असे आरोपीचे नाव आहे. नोकरी सोडण्यापूर्वी त्यांनी कंपनीची गोपनीय माहिती असलेला सर्व डेटा चोरल्याचे ‘आयटी टीम’च्या निदर्शनास आले. चाकण पोलिस ठाण्यामध्ये कंपनीच्या वतीने मुनीश कुंदनलाल राठी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.