पुणे

कोथरूडकरांची मेट्रोला पसंती

CD

पुणे, ता. ९ ः एसटी, रेल्वेच्या प्रवासासाठी स्थानकांपर्यंत पोहचण्यासाठी मेट्राचा वापर करण्यास कोथरूडकरांनी पसंती दर्शविली आहे. परिणामी वनाज-रामवाडी मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या लक्षणीयरित्या वाढू लागली आहे.
शहरात लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला परिसर म्हणून कोथरूड ओळखला जातो. येथील वनाज-रामवाडी हा सुमारे १६ किलोमीटरचा मार्ग आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. या मार्गावर मेट्रोची १५ स्थानके आहेत. शहराच्या मध्यभागातून म्हणजे नळस्टॉप, गरवारे कॉलेज, संभाजी उद्यान, महापालिका, शिवाजीनगर, आरटीओ कार्यालय (मंगळवार पेठ), पुणे रेल्वे स्टेशनमार्गे नगर रस्त्याला कल्याणीनगर, विमानगरमार्गे जोडला जातो. या मार्गावर रामवाडी स्थानकावरूनही प्रवाशांची मोठी चढ-उतार होत आहे. या मार्गावर प्रवासी सर्वाधिक संख्येने पुणे रेल्वे स्टेशन आणि त्या खालोखाल महापालिका भवन येथे जात असल्याचे दिसून आले. गेल्या महिन्यात गणेशोत्सवादरम्यान मेट्रोची टप्प्याटप्प्याने वेळ वाढविण्यात आल्याने उपनगरांतून मेट्रोने प्रवासी मोठ्या संख्येने शहराच्या मध्यभागात आले.

तीन महिन्यांतील आकडे बोलतात

१) वनाज-रामवाडी
- प्रवासी - ७५ लाख ३५ हजार २४२
- उत्पन्न - १२ कोटी ४ लाख ५५ हजार ०२६
- प्रवाससाठी वेळ - ३४ मिनिटे

२) वनाज ते पुणे रेल्वे स्टेशन
- प्रवासी - ९ लाख ४३ हजार ५९७
- उत्पन्न - १ कोटी ४१ लाख ०४ हजार ८७७ रुपये
- प्रवासासाठी वेळ - २३ मिनिटे

३) वनाज ते महापालिका भवन
- प्रवासी ः ८ लाख ८० हजार ९६५
- उत्पन्ना ः कोटी २२ लाख ९३ हजार २३० रुपये
- प्रवासासाठी वेळ - २० मिनिटे

प्रवासी म्हणतात
आशा माने (लीला पार्क) ः कोथरूडवरून पुणे स्टेशनला जायला खूप वेळ लागायचा. परंतु मेट्रो सुरू झाल्यापासून आम्ही रेल्वे स्टेशनला अगदी सहज व वाहतुकीच्या कोणत्याही अडथळ्याविना पोहचतो. बरेचदा घाई गडबडीच्या वेळेला आम्हाला बसची वाट पाहण्यापेक्षा रिक्षाने जावे लागायचे. आता आमचा तो खर्च वाचला आहे.

संगीता पासलकर (शास्त्रीनगर) ः वनाज ते रामवाडी मेट्रो झाल्यामुळे रूबी हॉलपर्यंत दवाखान्यात जाणे सोपे झाले. आता स्वारगेट ते चिंचवड मेट्रो झाली आहे. सात मिनिटांच्या अंतरावर मेट्रो आहे. बस केव्हा येईल हे कधीच समजायचे नाही. ‘एसी’मध्ये प्रवास होतो हा आणखी एक फायदा.

नितीन गायकवाड (सागर कॉलनी) ः मेट्रोमुळे आमची प्रवासाची दगदग संपली. फक्त पार्किंगचा प्रश्न आहे. पूर्वी सायकल नेता येत होती. पण प्रवासी वाढल्याने आम्ही नेत नाही.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT