पुणे, ता. ९ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत ‘सकाळ स्कूलिंपिक’ या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेला सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात झाल्यापासून शाळांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहील. सर्व शाळा तसेच विद्यार्थ्यांनी या मुदतीत नोंदणीप्रक्रिया पूर्ण करावी.
या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांसह विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. या वेळी २३ क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. सांघिक क्रीडाप्रकारांत बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल या सात खेळांचा समावेश आहे. बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, जिम्नॅस्टिक्स, ज्यूदो, तायक्वांदो, ॲथलेटिक्स, स्केटिंग, टेनिस, जलतरण, टेबल टेनिस, कुस्ती, नेमबाजी, तिरंदाजी, बुद्धिबळ, मल्लखांब आणि सायकलिंग असे १६ वैयक्तिक क्रीडाप्रकार आहेत. या स्पर्धेतून खेळाडूंना तब्बल दोन हजार ४७९ पदके पटकावण्याची संधी मिळाली आहे.
पूनावाला फिनकॉर्प स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. आर्यन वर्ल्ड स्कूल, मे. बी. जी. चितळे डेअरी हे सहयोगी प्रायोजक आहेत. भैरवी प्युअर व्हेज फूड पार्टनर, अभिजित कदम स्पोर्ट्स डेव्हलपमेंट सेंटर -भारती विद्यापीठ व ट्रिनिटी यूनिवर्सिटी हे ग्राउंड पार्टनर, एनपीएव्ही सायबर सेक्युरिटी पार्टनर, कॅप्चर फोटो टेक्नॉलॉजी पार्टनर आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क - ९५६१८१४९३२/९५६१२१४९३२
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.