पुणे

सेक्स एस्कॉर्टच्या नावावर होतेय तरुणांची फसवणूक

CD

पुणे, ता. १७ : सायबर चोरट्यांनी तरुणाचा फोटो मॉर्फ करून त्याला टेलिग्रामवर सात-आठ अश्‍लील फोटो पाठविले. त्यानंतर ते फोटो आई-वडिलांना पाठविण्याची धमकी दिली. सेक्स एस्कॉर्टची सेवा वापरल्याचे सांगून तरुणाकडून ७८ हजार रुपये उकळले. अशा प्रकारच्या घटनांवरून सेक्स एस्कॉर्टच्या माध्यमातून तरुणांना लुबाडण्याचा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.
विमाननगर परिसरातील म्हाडा कॉलनीतील १९ वर्षीय तरुणाशी दोघांनी मोबाईलवर संपर्क साधला. पंकज भदौरिया आणि जगदीश नावाच्या आरोपींनी या तरुणाला त्याचे मॉर्फ केलेले अश्‍लील फोटो टेलिग्रामवर पाठविले. ते फोटो त्याच्या आई-वडिलांना पाठविण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणाच्या व्हॉटसअॅपवर क्यूआर कोड पाठवला. आरोपींनी तरुणाला सेक्स एस्कॉर्टची सेवा घेतल्याचे सांगितले. ती सेवा रद्द करायची असेल तर पैसे द्यावे लागतील, असे धमकावले. त्यामुळे तरुणाने घाबरून ७८ हजार रुपये आरोपींना पाठविले. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतूक पोलिसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ! ‘एसीपी’ म्हणाले, वाहतूक पोलिसांना दिले जाणार चांगले वागण्याचे धडे; सहायक पोलिस आयुक्तांची झाली आदलाबदली

Ragi Ghavan: ग्लूटेन-फ्री नाश्ता हवाय? मग ही नाचणीच्या घावणाची रेसिपी नक्की ट्राय करा

Horoscope: पैशांच्या बाबतीत नशीबवान असतात ‘या’ 5 राशी; कमाईसोबत पैसा टिकवण्यातही पुढे!

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

SCROLL FOR NEXT