Solapur To Pune Travel  sakal
पुणे

Solapur To Pune Travel : सोलापूर-पुणे आता ४० मिनिटांत; मुंबईच्या आधी पुण्याला विमानसेवा, ‘व्हीजीएफ’ अंतर्गत होणार ‘उडान’

सोलापूर विमानतळाचे उद्‌घाटन झाल्यानंतर काहीच दिवसांत सोलापूरहून पुण्यासाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे सोलापूरहून पुण्याला आता अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत पोहोचता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

-प्रसाद कानडे

पुणे : सोलापूर विमानतळाचे उद्‌घाटन झाल्यानंतर काहीच दिवसांत सोलापूरहून पुण्यासाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे सोलापूरहून पुण्याला आता अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत पोहोचता येणार आहे. सोलापूर-मुंबई सेवा सुरू करण्याच्या आधी सोलापूर-पुणे विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे.

‘फ्लाय ९१’ या कंपनीची ही सेवा असणार असून, व्हायबिलिटी गॅप फंडिंग (व्हीजीएफ) योजनेंतर्गत पुण्यासाठी सेवा सुरू केली जात आहे. यात विमान कंपनीचे आर्थिक नुकसान झाले, तर राज्य सरकार त्यांच्या नुकसानीची भरपाई करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे गुरुवारी (ता. २६) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन होणार आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवा नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

सोलापूर-मुंबई विमानसेवेला होणाऱ्या विलंबामुळे सोलापूर-पुणे विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारदेखील सकारात्मक आहे. त्यामुळेच ‘व्हीजीएफ’ योजनेत प्रवाशांना तिकिटामागे अनुदान दिले जाणार आहे.

एटीआर ७२-६०० विमानाचा होणार वापर

सोलापूर-पुणे प्रवासासाठी ‘एटीआर ७२-६००’ या प्रकारचे विमान वापरले जाणार आहे. ताशी ५१८ किमी वेगाने, तर २५ हजार फूट उंचीवरून हे विमान उडू शकते. सोलापूर ते पुणे या दरम्यान हवाईअंतर १२६ किलोमीटर आहे. त्यामुळे सोलापूरहून हे विमान झेपावल्यावर पुण्याला अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत पोहोचू शकणार आहे. तर याचा ग्राउंड वेळ १० ते १२ मिनिटे असू शकते.

पुण्यातून होणार सोलापूर विमानतळाचे उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ सप्टेंबरला पुण्यात विविध विकासकामांचे उद्‌घाटन होणार आहे. याचवेळी सोलापूर विमानतळाचे उद्‌घाटन केले जाणार आहे. उद्‌घाटनानंतर सोलापूरहून प्रातिनिधिक स्वरूपात सेवा सुरू झाली हे दर्शविण्यासाठी सोलापूरहून एक विमानदेखील झेपावणार आहे.

मुंबईच्या आधी सोलापूर-पुणे विमानसेवा सुरू होत आहे. ‘व्हीजीएफ’ योजनेत ही सेवा सुरू होत असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यासाठी मंजुरी दिली आहे. विमानतळाचे उद्‌घाटन झाल्यानंतर काहीच दिवसांत ही सेवा सुरू करण्याचे आमचे प्रयत्न असणार आहेत.
-मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री, केंद्रीय विमान वाहतूक

ज्या शहरात विमानतळ आहे, पण सेवा नाही, अशा ठिकाणी प्रादेशिक जोड योजना महत्त्वाची ठरते. सोलापूर विमानतळाचा समावेश त्यातच होतो. सोलापूरहून पुण्याला विमानसेवा सुरू झाल्यानंतर तेथील उद्योगाला चालना मिळणार आहे.
-धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ञ, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT