पुणे

‘साप्ताहिक सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त संदीप वासलेकर यांचे व्याख्यान

CD

‘साप्ताहिक सकाळ’च्या वर्धापनदिनी
संदीप वासलेकर यांचे व्याख्यान
पुणे, ता. ३० : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाशी घट्ट नाते जोडणाऱ्या ‘साप्ताहिक सकाळ’च्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यूहनीतिज्ञ, आंतराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक-विश्लेषक, लेखक व ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’चे अध्यक्ष संदीप वासलेकर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अ वर्ल्ड विदाऊट वॉर’ या त्यांच्या अलीकडील पुस्तकाच्या अनुषंगाने ते जागतिक स्थितीविषयी विवेचन करणार आहेत.
‘तिसरे महायुद्ध की वसुधैव कुटुंबकम्’ या विषयावरील त्यांचे हे व्याख्यान शुक्रवारी (ता. ४) संध्याकाळी साडेपाच वाजता टिळक स्मारक मंदिरात होणार आहे.
चौथ्या दशकाच्या दिशेने झेपावणारा ‘साप्ताहिक सकाळ’ आता संपूर्णपणे नव्या स्वरूपात वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘प्रत्येक अंक आता विशेषांक’ अशी कल्पना घेऊन ‘साप्ताहिक सकाळ’ने गेल्या सहा महिन्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, पर्यटन, देवस्थाने यापासून ते आधुनिक काळातील स्टार्टअपपर्यंतच्या क्षेत्रांतील विविध पैलूंचा वेध घेणारे विशेषांक सादर केले आहेत.
बदलत्या काळातील करिअरसाठी मार्गदर्शन करण्याबरोबर, जीवनशैलीतील बदलांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर जनजागृतीचे कार्य जसे ‘साप्ताहिक सकाळ’ने केले, तसेच प्राचीन वैद्यकशास्त्र असलेल्या आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचाराचे महत्त्वदेखील ठळकपणे अधोरेखित केले. फक्त मनोरंजन न करता समाजाच्या विविध अंगांबद्दल वाचकांची समज वाढविण्याचे आणि त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचे कार्य ‘साप्ताहिक सकाळ’ सातत्याने करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धापन दिनाच्या निमित्ताने जागतिक स्तरावरील तणावपूर्ण स्थितीचे विश्लेषण आणि भविष्यातील धोरणांवर परखड मत व्यक्त करणाऱ्या वासलेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

नवे पैलू उलगडणार
जागतिक स्तरावर वाढणारे तणाव आणि भविष्यातील संभाव्य परिणामांचे आकलन, तसेच जगाला एका कुटुंबाप्रमाणे एकत्र आणण्याचे महत्त्व, हे वासलेकर यांच्या व्याख्यानाचे मुख्य मुद्दे असणार आहेत. वासलेकर यांच्या विचारमंथनातून तिसऱ्या महायुद्धाच्या संभाव्यतेवर श्रोत्यांना एक सुसंगत आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन मिळेल. या व्याख्यानाच्या निमित्ताने ‘साप्ताहिक सकाळ’च्या वाचकांसाठी जागतिक राजकारण, राजकीय धोरणे, युद्ध आणि शांतता या विषयांचे नवे पैलू उलगडले जातील.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Political: इम्रान खान यांच्या बहिणीला घरातून ताब्यात घेतले; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात कारवाई

Amravati College Student Case : कॉलेज तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत ठेवले संबंध, फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; १ लाख ३२ हजार हडपले

Western Vidarbha Crop Damage : पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये गणरायाचे विसर्जन करताना Engineering च्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा कस लागणार; लवलिना-नरेंद्रची थेट उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात

SCROLL FOR NEXT