पुणे

औंध आयटीआयतर्फे सोमवारी करिअर मार्गदर्शन शिबिर

CD

पुणे, ता. ८ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (आयटीआय) इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरा’चे आयोजन सोमवारी (ता. १०) औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी सभागृहात करण्यात आले आहे. दुपारी साडेबारा ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबिर असणार आहे.

शिबिरात दहावी - बारावीनंतर करिअर कसे निवडावे, शिक्षणाच्या विविध संधी कशा उपलब्ध होऊ शकतील, या विषयावर मान्यवरांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार असून सचित्र प्रदर्शन, आयटीआय अभ्यासक्रम आणि पुढील शिक्षण, बारावीनंतरचे अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती, परदेशातील शिक्षण, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि स्वयंरोजगाराबाबत माहिती देणारे स्टॉल येथे असणार आहेत. प्रामुख्याने इयत्ता नववी ते बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी, पालक - शिक्षक यांनी जास्तीत जास्त संख्येने शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! एसटीच्या जादा बसफेऱ्यांचे नियोजन; पाहा वेळापत्रक

Pune: मुलीला मिठी मारून विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षे कारावास; जुन्नर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Tea Dispute: भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

Medha Kulkarni: ''मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पुढे बसू नका'', पुण्यात मेधा कुलकर्णींचा अपमान? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा, अभिमन्यू पवारांवर आरोप

Latest Marathi News Live Update : रानडुकराचा हल्यात जखमी झालेले गोविंद पिंजरकर यांची प्राणज्योत मावळली

SCROLL FOR NEXT