

MSRTC special ST buses arranged for Pandharpur Wari pilgrims
Esakal
ठाणे : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने विशेष नियोजन केले आहे. २० ते ३० जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी एकूण १६ जादा एसटी फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, शहापूर, मुरबाड, वाडा; तसेच बोरीवली येथून या विशेष बससेवा उपलब्ध होणार आहेत.