पुणे

विस्तारित मेट्रो प्रकल्पासाठी आर्थिक तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती

CD

पुणे, ता. ६ : शिवाजीनगर ते लोणी काळभोर आणि खडकवासला ते खराडीदरम्यानचा विस्तारित मेट्रो प्रकल्प ‘खासगी भागीदारी तत्त्वावर’ (पीपीपी) की ‘ठेकेदाराची नेमणूक करून’ (ईपीसी) राबविणे योग्य आहे, याची तपासणी करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) आर्थिक तांत्रिक सल्लागार नेमण्यात आला आहे. सल्लागाराकडून तीन महिन्यांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली यावर निर्णय घेण्यासाठी पुणे युनिफाइड अर्बन ट्रान्स्पोर्ट ॲथॉरिटीची (पुमटा) बैठक झाली. बैठकीला पुलगेट ते हडपसरदरम्यान आठ किलोमीटर मार्गाचा तांत्रिक व आर्थिक अहवाल पीएमआरडीए आणि महामेट्रोने स्वतंत्रपणे तयार करावा. त्यात आर्थिकदृष्ट्या कोणाचा प्रकल्प व्यवहार्य आहे. कोणी त्या मार्गाचे काम करावे, यावर निर्णय घेण्यात यावा, असे ठरले होते.
त्यानुसार शिवाजीनगर ते लोणी काळभोर व खडकवासला ते खराडीदरम्यान मेट्रोचे विस्तारीकरण कोणत्या पद्धतीने करणे योग्य होईल, याबाबत निर्णय घेण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने आर्थिक तांत्रिक सल्लागार नेमावा, अशा सूचना ‘पुमटा’ने दिल्या आहेत. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून सल्लागाराची नेमणूक करण्या आली, असे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.

असे आहेत मार्ग
- खडकवासला- स्वारगेट- पुलगेट- हडपसर फाटा (मगरपट्टा सिटी) ते खराडी हा सुमारे २८ किलोमीटर लांबीचा मेट्रोमार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे.
- शिवाजीनगर-पुलगेट- हडपसर ते लोणी काळभोर हा १९ किलोमीटरचा मार्ग ‘पीएमआरडीए’ने प्रस्तावित केला आहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण करून सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. तीन महिन्यांत याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
- राहुल महिवाला, आयुक्त, पीएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT