पुणे

जागा पूर्वीपासून कात्रज डेअरीचीच

CD

पुणे, ता. ६ ः पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील (डीपी) मैदानाचे आरक्षण उठवून ही जागा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) वापरासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यास विरोध होत असताना त्यावर दूध संघातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले.
कात्रज डेअरीने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, ही जागा पूर्वीपासून कात्रज डेअरीचीच आहे. येथे डेअरी विस्तारीकरणाचा प्रकल्प प्रस्तावित असल्याने ही जागा आवश्‍यक असून विकास आराखड्यात बदल केला जात आहे. आम्ही कायमच पुण्याच्या विकासासाठी सहकार्य केले आहे. सातारा रस्ता व कात्रज चौक ते मैत्री चौक यादरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी चार एकर जागा दिली आहे, असे दूध संघातर्फे स्पष्ट करण्यात आले.
पुणे महापालिकेचा डीपी करताना २०१५ मध्ये कात्रज डेअरीच्या जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकण्यात आले होते. त्या वेळी महापालिका आयुक्त, नगररचना संचालक, नगर अभियंता यांच्या त्रिसदस्यीय समितीने हे आरक्षण काढून टाकून हा भाग निवासी केला होता. मात्र, २०१६ च्या सुधारित विकास आराखड्यामध्ये महापालिकेने या जागेवर पुन्हा खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकले. तसेच या जागेतून १२ मीटरऐवजी २४ मीटरचा रस्ता प्रस्तावित केला. या जागेत डेअरीचे विस्तारीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ७४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पण मैदानाच्या आरक्षणामुळे या कामात अडथळा निर्माण झाला असल्याने शासन व महापालिकेकडे पाठपुरावा करून हे आरक्षण उठविण्यासाठी कार्यवाही केलेली आहे.

शासनाकडून दूध संघास जागा
राज्य शासनाने १९६९ मध्ये ही जागा दूध संघास दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व निर्मितीसाठी दिलेली आहे. २०१३ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा दूध संघाच्या नावाने केली. या जागेत प्रशासकीय इमारत, उत्पादन प्रक्रिया प्लांट, सर्व्हिसेस ब्लॉक इमारत, खरेदी व स्टोअर इमारत, प्रशिक्षण केंद्र, कामगार वसाहत, गोठा आदीचा समावेश आहे, असे दूध संघातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT