पुणे

भाजप

CD

राज्यात लवकरच राजकीय भूकंप
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

पुणे, ता. ६ ः पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश करून घेण्याची जबाबदारी टाकली आहे. जानेवारी महिना पक्षप्रवेशासाठी दिला आहे. येत्या काळात मोठे राजकीय भूकंप होणार आहेत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
पुणे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाच्या ‘सुपर वॉरिअर्स’ची बैठक बावनकुळे यांनी घेतली. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रकाश जावडेकर, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, सचिव वर्षा डहाळे आदी उपस्थित होते. यावेळी मनसेचे मंदार बलकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
‘‘गेल्या २५ वर्षांत जे आमदार झाले, खासदार झाले, निवडणुकांमध्ये पडले असले तरीही अशा नेत्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना सक्रिय करा, असे आदेश पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात अनेक मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. प्रत्येक बूथची बैठक घेऊन, १००-१५० नागरिकांना बोलावून त्यांच्यासोबत ‘मन की बात’ करा. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजनांची माहिती द्या. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळविण्यासाठी आपण सुपर वॉरिअर्स ही संकल्पना राबविली आहे. प्रत्येकाने आपले फॉलोवर्स वाढविण्यासाठी प्रयत्न करा,’’ अले बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले.
दरम्यान, बावनकुळे यांनी बैठकीत पुण्यातील कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांची बाजू सावरून घेतली. लोकांपर्यंत पोचण्यासाठी पुण्यातील कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने काम करतील. पुढच्या वेळी तुम्हाला पुण्याबद्दल तक्रार करण्याची संधी देणार नाही. पुणे शहरातील कोणत्याही सुपर वॉरिअर्सला बदलण्याची वेळ येणार नाही,’’ असे पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांना आश्‍वासन दिले. तसेच ‘‘मकरसंक्रांतीनिमित्ताने आपण एक लाख घरात तिळगूळ वडी, एक लाख घरात हळदी कुंकवाचे वाण आणि एक लाख महिलांना श्रीराम लिहिलेली साडी देणार आहोत. पक्षवाढीसाठी काम करताना साधनांची कमी पडणार नाही’’, असेही पाटील म्हणाले.

आमदार कांबळेंनी जे केले ते गंभीर
भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलिस कर्मचाऱ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कानाखाली मारले. पोलिसाला मारल्याने याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘‘सुनील कांबळे यांनी जे काही केले ते गंभीर आहे. याची पोलिस चौकशी करतीलच, पण पक्ष म्हणूनही याची चौकशी केली जाईल. यामध्ये कांबळे यांचेही म्हणणे आम्ही ऐकून घेऊ.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

Wani News : मार्कंडेय पर्वतावर पुन्हा ‘बंदी’चा डोंगर! चार वर्षांत धोकादायक शिड्या-पायवाटांची दुरुस्ती नाही, भाविकांचा संताप

SCROLL FOR NEXT